मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी संतपीठाचे लोकार्पण

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी संतपीठाचे लोकार्पण

पाच प्रमाणपत्र कोर्सची होणार सुरुवात

औरंगाबाद - Aurangabad

पैठण (Paithan) येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून (Marathwada Mukti Sangram Day) होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याहस्ते संतपीठाचे लोकार्पण होईल, असे रोहयो मंत्री संदीपान भूमरे (Minister Sandipan Bhumare) म्हणाले. भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी आज पैठण येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

सध्या सुरू असलेल्या विविध कामांची, इमारतीत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करत अधिकारी यांनी सूचविलेल्या अडचणी समजून घेतल्या.त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देशही दिले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती सूर्यवंशी, समन्वयक प्रवीण वक्ते उपस्थित होते.

लोकार्पणानंतर संतपीठ येथे सुरुवातीला संत साहित्य, तत्वज्ञानावर आधारित पाच परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या संतपीठाच्या माध्यमातून मुल्याधारीत लोकशिक्षणास चालना मिळेल. पैठण येथील उद्योग आणि रोजगार क्षेत्रासही लाभ होईल, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com