Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउद्धव ठाकरेंच्या सभेचा जागर थेट उद्यानापर्यंत! 

उद्धव ठाकरेंच्या सभेचा जागर थेट उद्यानापर्यंत! 

औरंगाबाद – aurangabbad

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची ८ जूनला होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन अतिशय काटेकोरपणे केले जात असून जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी थेट सिद्धार्थ उद्यानात मॉर्निंग वॉक (Morning walk) करायला आलेल्या औरंगाबादकरांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना सभेचे (निमंत्रण) निमंत्रण दिले. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी, महिला व युवा वर्गाने शिवसेनेच्या वतीने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर औरंगाबाद शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या विषयांवर आपले प्रखर मत मांडतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या अतिविराट सभेचे नियोजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात केले जात आहे. विशेष म्हणजे या नियोजनात विविध समित्या स्थापन करून जबाबदारी समजावून सांगितली जात आहे.गुरुवारी पहाटे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ उद्यानात पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरवासीयांना भेटून जाहीर सभेविषयी माहिती देऊन निमंत्रणही दिले.

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत सभेचे निमंत्रण मिळाल्याने सर्वांचे चेहरे फुलले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नागेश्वरवाडी-खडकेश्वर या भागात घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा ही हिंदुत्वाची हुंकार देणारी ठरणार आहे. या सभेसाठी हजारोच्या संख्येने शिवसैनिक तथा शिवसेनेवर प्रेम करणारे बंधू-भगिनी तसेच युवा उत्सुक असल्याचे पाहावयास मिळाले.

थेट आठवडी बाजारात संवाद

जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी छावणीतील आठवडी बाजारात जाऊन जाहीर सभेसाठीची निमंत्रणे देत नागरिकांशी संवाद साधला. पक्षाची भूमिका आणि सरकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून होत असल्याचे सांगितले. बाजारासाठी आलेल्या नागरिकांनीही शिवसेनेच्या या निमंत्रणाचा स्वीकार करत साद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या