औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा तोट्यात

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा तोट्यात

सलग तिसऱ्या वर्षी घटले उत्पन्न

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (International Airport) नाव सलग तिसऱ्या वर्षी तोट्याच्या यादीत आले आहे. तोटा 33 टक्क्याने कमी झालेला असताना, वार्षिक 40 कोटी रुपयांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. यामुळे विमानतळाच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे (एएआय) (Airports Authority of India) संचालित 136 पैकी 107 विमानतळे 2020-21 आर्थिक वर्षात 2948 कोटी रुपये नुकसान झाल्याची माहिती केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. चिकलठाणा विमानतळाच्या बाबतीत विमानांची संख्या वाढूनही सलग तीन वर्षे गटातील सर्वाधिक तोटा असणाऱ्या विमानतळाच्या यादीत पहिल्या पाचमध्ये येण्याची नामुष्की ओढवली आहे. विमानांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यात लोकप्रतिनिधी, औद्योगिक संघटना, पर्यटन व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन विमान कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करण्यात आले. विमानांची संख्या वाढली. यामुळे विमानतळाचा तोटाही कमी झाला होता.

विमानतळाचा 2018-19 मध्ये 58.71 कोटी रुपयांपर्यंत गेलेला तोटा गेल्या वर्षी करोना असूनही 40.55 कोटी रुपायांपर्यंत खाली आला. तोटा कमी करण्यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढविण्यासह, (Aircraft parking) विमान पार्किंग तसेच कार्गो सुविधाही (Cargo facility) वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com