औरंगाबादला मिळाले हजार कोटीचे ‘ग्रीनफिल्ड’ गिफ्ट!

चार टप्प्यात मिळणार निधी
औरंगाबादला मिळाले हजार कोटीचे ‘ग्रीनफिल्ड’ गिफ्ट!
USER

औरंगाबाद - Aurangabad

महापालिकेने (Municipal Corporation) सुरूवातीला निवडलेल्या अन् नंतर डावललेल्या (Smart City) स्मार्ट सिटीतील ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे (Greenfield Project) औरंगाबाद शहराला आता एक हजार कोटी रुपयांचे गिफ्ट मिळाले आहे. (Central Government) केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना ही पाच वर्षांची असून मार्च 2022 मध्ये या प्रकल्पाची मुदत संपणार आहे. मात्र स्मार्ट सिटी मिशनच्या पुढील टप्प्यात आता वित्त आयोगाने 2021-2026 या पाच वर्षांसाठी केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालामध्ये नवीन शहरांच्या निर्माणासाठी (ग्रीनफिल्ड) देशातील विविध राज्यातील निवडक शहरांना 8 हजार कोटी रुपयांच्या निधीची शिफारस केली आहे. त्यासाठी औरंगाबादसह 8 शहरांची यासाठी निवड केली आहे.

वाढते शहरीकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. यात देशातील निवडक अशा एकूण 100 शहरांची चार फेर्‍यांमध्ये निवड केली होती. यात औरंगाबाद शहराचा दुसर्‍या फेरीमध्ये समावेश झाला होता. त्यात प्रत्येक शहरासाठी एक हजार कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केला गेला. यापैकी 50 टक्के वाटा केंद्र सरकार, 25 टक्के राज्य सरकार आणि उर्वरित 25 टक्के वाटा स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलायचा, असे धोरण ठरलेले आहे.

मात्र शहराच्या बाबतीत पालिकेचा निधी उपलब्ध नसल्याने मागील 5 वर्षामध्ये सुमारे 750 कोटी रुपयांचेच प्रकल्प राबवण्यात येत आहे, यात प्रामुख्याने स्मार्ट शहर बस, सफारी पार्क, एमएसआय प्रकल्प, जीआयएस मॅपिंग आदी प्रकल्पांचा समावेश आहे. आता आगामी 4 वर्षात अधिकचा एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने शहरात अनेक मोठे प्रकल्प राबविले जाऊ शकतात, ज्यात प्रामुख्याने नव्याने जोडल्या गेलेल्या भागाचा डेव्हलपमेंट प्लाननुसार विकास करणे शक्य होणार आहे. 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसीमध्ये स्मार्ट औरंगाबादला देशातील आठ शहरात स्थान मिळाले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहराचा देखील समावेश आहे. शहर विकासासाठी आता केंद्र सरकारकडून अतिरिक्त 1,000 कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे. हा निधी 2022-23 या वित्तीय वर्षापासून 4 टप्प्यात मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 15 व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला नवीन शहर निर्माणासाठी औरंगाबाबद शहरासाठी अतिरिक्त एक हजार कोटी रुपये देण्याची शिफारस केल्याचे कळते आहे. मात्र या संदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नाहीत.

15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसी अशा

1) कोरोना महामारीने शहरी भागात गृहनिर्माण व पायाभूत सुविधांच्या अपुर्‍या समस्येवर लक्ष.

2) शहरीकरणाचा कल पाहता, देशाला जुन्या शहरांचे कायाकल्प तसेच नवीन शहरांची उभारणीची गरज.

3) ग्रीनफिल्डअंतर्गत नवीन शहर उभारण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 8 शहरांची निवड केली आहे.

4) हेल्थ सेक्टर व्यतिरिक्त या निवडक स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढील चार वर्षात हा निधी मिळेल.

5) प्रस्तावित नवीन शहर बांधण्याची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी लागेल.

6) गठीत तज्ज्ञांच्या समितीत स्वतंत्र डोमेन तज्ज्ञ आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी असतील.

7) ग्रीनफिल्डसाठी योजनेचा निधी पहिला टप्प्यातील निधी खर्च केल्यानंतर पुढील निधी उपलब्ध होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com