आता अधिकचे प्रवेश रोखण्यासाठी भरारी पथके

होणार कठोर कारवाई 
आता अधिकचे प्रवेश रोखण्यासाठी भरारी पथके

औरंगाबाद - aurangabbad

अकरावी प्रवेश प्रक्रियेत (Eleventh Admission) अधिकचे प्रवेश रोखण्यासाठी जिल्हावार चार भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना (Education Officer) याबाबत निर्देश दिले आहेत.

दहावीचा (ssc) निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची लगबग सुरू झाली. अनेक महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीची प्रकिया पूर्वीच सुरू केली. निकालानंतर शिक्षण उपसंचालकांनी अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विविध सूचना, निर्देश दिले आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्रवेश क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवेश देणे, अतिरिक्त प्रवेशास परवानगी न घेता. जादा प्रवेश असे अनेक प्रकार अनेकदा समोर येतात. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले. अधिकचे प्रवेश रोखण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर पथके स्थापन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यात किमान चार पथके स्थापन करून त्यावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवेशाची पडताळणी करणे, अहवाल सादर करायचे आहेत. त्यासह अतिरिक्त वेशास परवानगी मिळणेवावतचे प्रस्ताव परस्पर सादर करता येणार अशा खबरदारीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार रोखले जातील, असे सांगण्यात येते.

अशा आहेत सूचना

अकरावीत प्रवेश देताना उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना मंजूर वर्ग, शाखा व तुकड्या यांची प्रवेश क्षमता विचारात घेऊन प्रवेश क्षमतेएवढेच प्रवेश द्यावेत, सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेतल्याशिवाय मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देण्यात येऊ नयेत, अतिरिक्‍त प्रवेशासाठीचे प्रस्ताव परस्पर कार्यालास सादर करू नयेत, अतितक् प्रवेश घेता दिल्यास अनधिकृत ठरविण्यात येतील आणि अशा विद्यार्थांचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे अर्ज भरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे उपसंचालकांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

विभागातील अकरावी प्रवेश क्षमता

अनुदानित संस्था- ८५,८४०

विनाअनुदानित संस्था- १,४१,८४०

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com