'सत्ताधाऱ्यां'च्या बंदला औरंगाबादकरांचा संमिश्र प्रतिसाद

व्यापारी महासंघ अलिप्त
'सत्ताधाऱ्यां'च्या बंदला औरंगाबादकरांचा संमिश्र प्रतिसाद

औरंगाबाद - aurangabad

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी (Lakhimpur Kheri, Uttar Pradesh) येथे घडलेल्या घटनेनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यभरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मात्र औरंगाबादेत या बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नसल्याचे (Merchants) व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. त्यामुळे बहुतांश भागातील दुकाने रोजप्रमाणे चालू होती काही ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर गुलमंडी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातारा, देवळाई, उल्कानगरी, शिवाजीनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद असून जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर व्यवहार बंद आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पाळण्यात येणार्‍या या कडकडीत बंदच्या निर्णयाची माहिती शहरातील तिन्ही आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी पत्र परिषदेच्या माध्यमातून दिली. तत्पूर्वी कडकडीत बंद पाठण्याचा निर्णय संयुक्‍त बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यात या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, काँग्रेसचे शहराध्यक्ष हीशाम उस्मानी, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जिल्हा सरचिटणीस राहुल सावंत, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी हे करत आहेत.

या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्व अंगिकृत संघटना, सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

व्यापारी महासंघाने महाविकास आघाडीने पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होण्यास नकार कळवला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा सोमवारी सुरू आहेत. या बंदमध्ये व्यापार्‍यांना सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी महासंघाचे ऐच्छिक ठेवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित व्यापारी या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com