Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल लवकरच

औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल लवकरच

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे. या विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण घेऊन उत्तीर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत औरंगाबाद विभागीय मंडळाचा 99.87 टक्के निकालाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत निकाल 9 जुलैच्या आत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board) वतीने घेण्यात येणारी दहावी वर्गाची परीक्षा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. राज्य सरकारने 2 जुलैपर्यंत संपूर्ण निकाल तयार करण्याचे आदेश शाळांना दिलेले आहे. माञ, शाळांना निकाल तयार करून मंडळाला पाठवताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने 9 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

यंदा दहावीचे 1 लाख 84 हजार 963 हजार विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शालेय स्तरावरून केले जात आहे. आजवर 99.87 टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करून औरंगाबाद विभागीय मंडळात शाळांनी पाठवले आहे. उर्वरीत शाळांनी 9 जुलैच्या आत निकाल पाठवणे अनिवार्य आहे, असे सुगता पुन्ने यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या