प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद जिल्हा  परिषद 'अव्वल' 

द्वितीय पुरस्कार उस्मानाबादला
प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद जिल्हा 
परिषद 'अव्वल' 

औरंगाबाद - Aurangabad

प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) (Pradhan Mantri Awas Yojana) औरंगाबाद जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांनी योजनेत उत्कुष्ट काम करणार्‍या अधिकारी व पदाधिकार्‍यांचे कौतुक करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

गरीब कुटुंबियांसाठी स्वत:चे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्वपूर्ण बाब आहे. अधिकार्‍यांनी विविध घरकुल योजना राबवतांना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाच ओझ वाटणार नाही असे प्रतिपादन केंद्रेकर यांनी यावेळी केले. यावेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, सहायक उपायुक्त (विकास) विना सुपेकर, विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामसेवक, तसेच संबंधित अधिकार्‍यांची उपस्थिती होती. कामगाराची घरकुल या योजनेकरिता देखील तहसिलदारांनी तात्काळ प्रस्ताव पाठवून जलदगतीने घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या तसेचथोडसं माय बापासाठी, या योजनेत उस्फुर्तपणे सहभागी होण्याचे जिल्हा परिषद, ग्रामपंचातींना आवाहन केले.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी, महाआवासमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट येण्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह सर्व अधिकार्‍यांचे योगदान असल्याचे सांगून, घरकुल योजनेत महिलांचा मोठा सहभाग राहिला असल्आयाचे सांगितले. यावेळी केंद्रेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक उपायुक्त (विकास) विणा सुपेकर यांनी केले.

पुरस्कारामध्ये जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांमध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार नायगांव, जि.नांदेड तर द्वितीय पुरस्कार वैजापूर, जि. औरंगाबाद या तालुक्यांना प्रदान करण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार पैठण तर द्वितीय पुरस्कार सिल्लोड तालुक्याला देण्यात आला. वित्तीय संस्था निकषामध्ये राज्य पुरस्कृत योजना व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन्ही निकषासाठी प्रथम क्रमांक महिंद्रा होम फायनान्स लि. सेलू जिल्हा परभणी यांना देण्यात आला. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत चुडावा, ता. पूर्णा, जि.परभणी, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत धानुरी, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत इरळद, ता.मानवत, जि. परभणी यांचा समावेश आहे.

तर प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) साठी प्रथम क्रमांक ग्रामपंचायत पारगावं, ता. वाशी, जि.उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कारासाठी ग्रामपंचायत सावळदबरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद, तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत जळकीघाट, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम क्रमांक मानवत, जि. परभणी, द्वितीय क्रमांक लोहारा, जि.उस्मानाबाद, तृतीय पुरस्कार पालम, जि.परभणी यांना देण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम पुरस्कार खुलताबाद, जि. औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार पालम, जि.परभणी, तर तृतीय पुरस्कार वाशी, जि.उस्मानाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम पुरस्कार उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कार औरंगाबाद तर तृतीय पुरस्कार परभणी यांना देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्हा परिषदेला देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com