औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा 150 टक्के पाऊस

मोठ्या प्रमाणावर नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा 150 टक्के पाऊस

औरंगाबाद - Aurangabad

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पैठण येथील नाथ सागर जलाशयात पाण्याचा वेग कायम आहे. त्यामुळे हा वेग पाहता येत्या 2 दिवसात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. (Vaijapur, Gangapur, Paithan) वैजापूर, गंगापूर, पैठण आदींसह जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. जनावरे, धान्य सुरक्षितस्थळी ठेवावेत, असेही आवाहन (Collector) जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजिकच्या उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेशी संपर्क साधावा. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे सर्व प्रकल्पातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पूर्व तयारी म्हणून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

पैठण तालुक्यातील बालानगर रोडवरील कापुसवाडी नदीच्या पुलावरून मोटरसायकलसह दोन जण वाहून जात असतांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांना वाचविण्यात यश. काल औरंगाबाद शहरातील हर्सूल तलावावर पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी वाढवला होता बंदोबस्त.

कन्नड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिशोर येथील रामेश्वर वस्तीवरील नागरिकांना करावा लागत आहे जीवघेणा प्रवास. कन्नड तालुक्यातील गडगद, शिवना, ब्राह्मणी, अंबाडी आदी नद्यांना महापूरमुळे अनेक गावांचा तुटला संपर्क.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरातील हिलाल नगर, मयुर पार्क परिसरात घरात घुसले पावसाचे पाणी. कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीच्या बाजूचे झाड रिक्षा आणि चार चाकीवर कोसळून वाहनांचे नुकसान. अतिवृष्टीमुळे सोयगाव-सिल्लोड तालुक्यातील खेळणा नदीला आला मोठा महापूर. सोयगाव तालुक्यातील बनोटी शिवारात सकाळी बसला गुलाबी चक्रीवादळाचा तडाखा; अनेक झाडे झाले जमीनदोस्त, शेतीचे मोठे नुकसान.

सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या संततधार ढगफुटी पावसामुळे निंबायती गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या महापुराच्या पाण्यात ५० घरे गेली वाहून.

Related Stories

No stories found.