औरंगाबादच्या विकासाला प्रथम प्राधान्य-रोहयो मंत्री संदीपान भुमरे

औरंगाबादच्या विकासाला प्रथम प्राधान्य-रोहयो मंत्री संदीपान भुमरे

औरंगाबाद - aurangabad

कोविड लसीकरण (Covid vaccination), प्रधानमंत्री मातृत्व वंदन, मतदार नाव नोंदणी, संतपीठाचा विकास, वृक्ष लागवड, सिंथेटिक ट्रॅक, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती आदींसह जिल्ह्यात विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून जिल्ह्याचा विकास होतो आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले. या मुख्य शासकीय समारंभात झेंड्यास सलामी दिल्यानंतर शुभेच्छा संदेशात मंत्री भुमरे बोलत होते. खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. एम. प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, सर्व विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुमरे म्हणाले, सामूहिक प्रयत्नांनी चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करून कोरोना सारख्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी अजूनही सतर्क राहणे मात्र आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने लसचे डोस पूर्ण करावेत.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत औरंगाबाद राज्यात दुसरा आहे. मतदार यादीत नाव नोंदणीकरीता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार दिवशी नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मतदार यादीतील नोंदी प्रमाणीकरणासाठी आणि दुबार नाव नोंदणी टाळण्यासाठी 1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्र आधार जोडणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

पैठणच्या संतपीठासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. इको बटालियन व CSR च्या मदतीने गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो आहे. शासनाने 2021 मध्ये 66 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु जिल्ह्याने तब्बल 85 लाख झाडे लावून त्याचे संगोपन केले. 127 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आपला जिल्हा यशस्वी झाला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या आत्मनिर्भरतेसाठी ‘उभारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून 119 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अनेक योजनांचा लाभ देऊन मदत करण्यात आली आहे. महाआवास ग्रामीण अभियानामध्ये औरंगाबाद विभागात प्रथम आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपले राज्य देशात तर आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com