सायबर शाखेची तत्परता ; दीड लाख आले परत

सायबर शाखेची तत्परता ; दीड लाख आले परत

औरंगाबाद - aurangabad

सायबर (Cyber ​​Crime) चोरट्याने फसवून लंपास केलेले एका मुख्याध्यापकाचे दीड लाख रुपये सायबर पोलिसांच्या (Cyber ​​Police) तत्परतेने परत मिळाले. या मुख्याध्यापकाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तातडीने सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही करत, ही रक्कम परत मिळवली, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी रविवारी (७ नोव्हेंबर) दिली.

राजेंद्र कहाटे (रा.औरंगाबाद) हे एका शाळेवर मुख्याध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बॅक खात्यावर होम लोनची मोठी रक्कम जमा झाली आहे. गेल्या आठवड्यात सायबर चोरट्यांनी कहाटे यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून केवायसी अपडेट करून क्रेडिट कार्डाची लिमिट वाढविण्यासाठी लिंक पाठवली होती.

कहाटे यांना काही ठिकाणी रक्कम द्यायची असल्याने त्यांनी क्रेडिट कार्डाची लिमिट वाढविण्यासाठी लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती दिली होती. त्यानंतर, या चोरट्यानेकहाटे यांच्या बँक खात्यातून एकलाख ५५ हजार ५५५ रुपये वळते करून घेतले. कहाटे यांना रविवारी ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीनेसायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार सुशांत शेळके व वैभव वाघचौरे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी तत्काळ ई-वॉलेट कंपनीच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधून राजेंद्र कहाटे यांच्या बँक खात्यातून चोरट्याने लांबविलेली रक्कम त्यांना परत मिळवून दिली.

वेळीच माहिती द्या

या प्रकरणात सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. यात आपल्या बँकेची माहिती फोन वरून कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. याबाबत काही तक्रार असल्यास थेट बँकेत जाऊन चौकशी करावी. फसवणूक झाली असेल,तर त्वरित लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com