गांजा विकणारी महिला जेरबंद 

गांजा विकणारी महिला जेरबंद 

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री (Drug sales) होत असून त्यामुळे गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. अशातच पोलिसांनी (police) खबऱ्यांच्या मार्फत कारवाई सत्र चालू केले असून साडेपाच किलो गांज्यासह एक महिला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गांजा विक्री करताना पतीला पोलिसांनी पकडले. गेल्या काही वर्षांपासून तो हर्सूल कारागृहात आहे. त्यामुळे पतीचा गांजा विक्री धंदा पललीने सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. एनडीपीएस पथकाने महिलेच्या घरात छापा मारून ५ किलो ५२१ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. दरम्यान, आरोपी महिलेस न्यायालयात हजर केले असता, ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. रंजना पांडे (रा. रामेश्‍वरनगर, मयूर पार्क) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्‍वर घुगे यांच्या पथकास रंजनाच्या घरातून गांजाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक घुगे, सहायक फौजदार नसीम खान, अंमलदार महेश उगले, धर्मराज जायकवाड, सुरेश भिसे, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे, आरती कुसळे आणि राजेंद्र चौधरी यांच्या पथकाने छापा मारला. तिच्या ताब्यातून ५ किलो ५२१ प्रम गांजा जप्त केला. हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या महिलेच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातही एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com