17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

'पॉस्को' कायद्यान्वये गुन्हा दाखल
17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

औरंगाबाद- Aurangabad

एका 17 वर्षीय मुलाने 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला जेरबंद केले आहे. 

काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी Mukundwadi पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीडित मुलीची आई शेजारील महिलांबरोबर भाजीपाला Vegetables आणण्यासाठी जात होत्या. पीडितेसोबत तिच्याच वयाचा शेजाऱ्याचा एक मुलगा खेळत होता. दोघेही लहान असल्यामुळे पीडितेच्या आईने बाहेर मोबाईल बघत बसलेल्या तरुणास आपल्या लहान मुलीकडे लक्ष देण्यास सांगितले.

घराशेजारील महिला बाजारात गेल्यामुळे परिसरात कोणीही नव्हते. याचा फायदा घेत त्या तरुणाने लहान मुलीला गोड बोलून तिच्याच घरात नेले व तिच्यावर अत्याचार करून तो निघून गेला.

जेव्हा भाजीपाला Vegetables घेऊन पीडितेची आई घरी आली तेव्हा मुलगी रडत होती. तिला सांगताही येत नव्हते. शेवटी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने सर्व घटना आईला सांगितली. मुलीचे वडील सायंकाळी उशिरा घरी आले. त्यांना घटना समजल्यानंतर रविवारी सकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तक्रार येताच तत्काळ गुन्हा दाखल करीत आरोपी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन इन कॅमेरा In-camera जबाब नोंदविला. यात त्याने मुलीवर अतिप्रसंग केल्याची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com