Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये दुसरी लाट ओसरली

औरंगाबादमध्ये दुसरी लाट ओसरली

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेत वाढती रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचाराची सेवा देण्यासाठी रुग्णालयांनी देखील 73 कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र मागी काही दिवसांपासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे शहरात सध्या केवळ 70 सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी 25 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे महापालिकेपाठोपाठ आता 18 खासगी रुग्णालयांनी देखील कोविड केअर सेंटर (Covid Care Center) बंद केले आहेत.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात कोरोनाची पहिली लाट मार्च 2020 पासून सुरू झाली आहेत. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. तर शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीत तीनशे खाटांचे कोविड रुग्णालय उभारून ते पालिकेला चालविण्यासाठी दिले.

या रुग्णालयासह पालिकेने सुरू केलेले सर्व कोविड केअर सेंटर्स दुसर्‍या लाटेत अपुरे पडले. त्यामुळे सेंटरची संख्या वाढवून ती 21 पर्यंत गेली. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी कमी होत आहे. त्यामुहे पालिकेने कोविड केअर सेंटर्स बंद केले आहेत. त्यासासोबतच आता खासगी रुग्णालये देखील कोविड केअर सेंटर्स बंद करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल करत आहेत. एकूण 70 पैकी आजवर 18 सेंटर्स बंद झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या