औरंगाबादेत दहा दिवसांत २२० बालकांना कोरोना!

तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक
औरंगाबादेत दहा दिवसांत २२० बालकांना कोरोना!
Cheyne Gateley/VIP

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे मानले जात असताना दुसऱ्या लाटेतच करोनाबाधित बालकांची संख्या वाढू लागली आहे. औरंगाबाद शहरात गेल्या दहा दिवसांत २२० बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात सहा ते अठरा वयोगटातील १७१ बालकांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक लागण होईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहरात तिसऱ्या लाटेच्या पूर्वीच कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

१० ते १९ मे या दहा दिवसांच्या काळात शून्य ते अठरा या वयोगटातील २२० बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांची संख्या ४८ असून, सहा ते अठरा वयोगटातील बालकांची संख्या १७१ आहे. कोरोनाबाधित बालकांची वाढती संख्या यंत्रणेसमोर चिंतेचा विषय ठरू लागली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com