Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized'हिजाब गर्ल' मुस्कानला औरंगाबादेत 'नो इंट्री'!

‘हिजाब गर्ल’ मुस्कानला औरंगाबादेत ‘नो इंट्री’!

औरंगाबाद – aurangabad

वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची शहरातील (Amkhas Maidan) आमखास मैदानावर होणाऱ्या सभेला औरंगाबाद शहर (police) पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता वंचितने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिकच तापण्याची शक्यता आहे. तर पोलिसांनी (Hijab Girl) हिजाब गर्ल मुस्कान खान हिला सुद्धा नोटीस पाठवली असून शहरात येण्यास बंदी घातली आहे.

- Advertisement -

(Karnataka) कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कानच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी साेमवारी औरंगाबादेत जाहीर सभेचे आयोजन केले होते. मात्र पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत या कार्यक्रमास परवानगी नाकारली. त्यामुळे वंचितचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी अशफाक पटेल यांच्यामार्फत खंडपीठात दाद मागितली. न्या. व्ही. के. जाधव व न्या. संदीपकुमार यांनी ही याचिका दाखल करून घेत पुढील सुनावणी २२ मार्च रोजी ठेवली आहे.

मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी ही माहिती दिली. सभेला परवानगी का नाकारली, अशी विचारणा करून खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावत २२ मार्चपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी माहिती घेण्यासाठी वेळ मागितली, ती विनंती मान्य करत सुनावणी पुढे ढकलली. हेट स्पीच विधेयकाबद्दल जनजागृतीसाठी प्रकाश आंबेडकरांनी या सभेचे आयोजन केले होते. मात्र त्याला परवानगी नाकारल्यामुळे आंबेडकरांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या