औरंगाबाद - aurangabad
शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा उन्हाळ्याचा तर रात्री हिवाळ्याचा फील येत आहे. परंतु, रविवारी रात्री अचानक थंड वारे सुरू झाल्याने तापमानात (temperature) मोठी घट झाल्याचे अनुभवायास आले. रविवारी रात्री औरंगाबाद शहराचा पारा १० अंशावर आला होता.
दिवसभरातील तापमानात चढ-उतार सुरू असल्याने थंडीचीही तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यात गेल्या दहा दिवसांपासून पारा काहीसा खाली घसरला आहे. परंतु, थंडीची तीव्रता फारशी जाणवत नाही. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, १६ डिसेंबरनंतर किमान तापमानात घट होत आहे. १६ डिसेंबर रोजी किमान तापमान १६ अंशावर होते. तर १८ डिसेंबर रोजी पारा १४.२ अंशावर होता. तर शनिवारी किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस असल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली आहे. पुढील काही दिवस थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल, अशी शक्यता एमजीएम हवामान विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली.