Accident ब्रिझा कारने बसलाच नेले फरफटत

Accident ब्रिझा कारने बसलाच नेले फरफटत
Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - aurangabad

भरधाव (Briza car) ब्रिझा कारचा भाग चालत्या ( st bus) एसटी बसच्या दरवाजात अडकला. त्यानंतर कारने बसला २० फूट फरपटत नेले. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने चाक निखळून अखेर बस दुभाजकावर चढली, तेव्हा या वाहनांना ब्रेक लागला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रवाशांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हा विचित्र (accident) अपघात सकाळी औरंगाबादमधील छावणी भागातील नगरनाका परिसरात घडला.

औरंगाबादहून-कोल्हापूर-कागल (Aurangabad-Kolhapur-Kagal) येथे जाणारी एसटी (एमएच ११ टी ९२९१) सकाळी बस स्थानकातून निघाली होती. शहरातून काही अंतरावर छावणी भागात जाताच तेथे भरधाव वेगात असलेल्या (एम.एच. २० डी.व्ही.५२३८) या क्रमांकाच्या ब्रिझा कारने बसला धडक दिली. या धडकेत कारचा भाग एसटीच्या दरवाज्यात अडकला. कार भरधाव वेगात असल्याने आणि दरवाजात कारचा भाग अडकल्याने कारने सुमारे वीस फूट अंतरापर्यंत बसला फरपटत नेले.

दरम्यान बसचे चाक निखळले आणि बस रस्त्यामधील दुभाजकावर चढली. यावेळी बसमध्ये पाचच प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (accident) अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी छावणी (police) पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com