नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक

७८२२ रुपयांचा साठा हस्तगत
नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक

औरंगाबाद - aurangabad

मुंबईतील (mumbai) ड्रग्जचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता शहरात अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला सिटी चौक (police) पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मानवी शरीरासाठी अपायकारक औषधी जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील लेबर कॉलनी परिसरातील विश्वास नगरात पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लेबर कॉलनीत राहणाऱ्या एका इसमाकडे गुंगीकारक आणि मानवी आरोग्यासाठी घातक नशेच्या औषधी सिरप व गोळ्यांचा साठा आहे. तेव्हा सय्यद यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी दिली.

खात्रीलायक मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लेबर कॉलनीतील विश्वास नगर येथील एस. कृष्णराव यांच्या घरात राहणाऱ्या अरबाज ऊर्फ गुड्डू गणी देशमुख वय २७ वर्षे या इसमाची घेण्यात आलेल्या झडतीत कॉवर नावाचे सिरप, व ई स्कफ सिरपच्या एकूण ६१ बाटल्या, तसेच अलप्रासेफ गोळ्यांच्या १२ स्ट्रीप मिळून आल्या ज्याची एकूण किंमत ७८२२ असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अरबाज ऊर्फ गुड्डू गणी देशमुख याला या औषधी साठ्याचे बिल आहे का, अशी विचारणा केली असता, त्याने नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे अवैधरित्या गुंगीकारक व नशेखोरीसाठीची औषधी बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अरबाज ऊर्फ गुड्डू गणी देशमुख याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.