Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedबिअरने भरलेला ट्रक उलटला 

बिअरने भरलेला ट्रक उलटला 

औरंगाबाद – Aurangabad

वडोदबाजार पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या नायगव्हाण गावाजवळ औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर बिअरने भरलेला ट्रक वळणावर वळण घेताना ओझ्यामुळे पलटी झाल्याने ट्रकमधील बिअरचे मोठे नुकसान झाले, तर ट्रक पूर्ण चक्काचूर झाला.

- Advertisement -

औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास बारा टायरचा ट्रक (एमएच २० डीई २१४५) औरंगाबादहून सिल्लोडच्या दिशेने जात असताना सकाळी नायगव्हाण गावाजवळ असलेल्या वळणावर ट्रकला

वळण न बसल्याने सदरील ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होताच सदर ट्रक बिअर बाटल्यांनी भरलेला असल्याचे कळायला वेळ लागला नाही. काहींचे जखमी ड्रायव्हरला काढण्याचे प्रयत्न, तर काहींचा ‘भर अब्दुला बिअर डिकी में’ असा प्रयत्न सुरू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

सदर घटना घडताच वडोदबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद पवार तत्काळ घटनास्थळी हजर झाले व ट्रकमधील ड्रायव्हरला ग्रामस्थाच्या मदतीने बाहेर काढले. या वेळी ट्रक ड्रायव्हर हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस आल्यामुळे तळीरामांची कोंडी झाली होती. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल दत्ता मोरे, योगेश चेळेकर, डोगरे, वाकेकर हे घटनास्थळी हजर झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या