Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedATM center एक कोटी १६ लाख ८० हजार लंपास

ATM center एक कोटी १६ लाख ८० हजार लंपास

औरंगाबाद – aurangabad

(ATM center) एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने वर्षभरात थोडे-थोडे करून तब्बल १ कोटी १६ लाख ८० हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. (ATM machine) एटीएम मशीनच्या ऑडिट (Audit) दरम्यान आठ जणांनी मिळून हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

खासगी व सरकारी (bank) बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये रोख रक्कम टाकण्याची कंत्राट खासगी कंपन्यांना दिले जाते. सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या कंपनीकडे देशभरातील राष्ट्रीयीकृत (sbi) एसबीआय, (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया तर खासगी अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडिया-१, रत्नाकर बँक, येस बँक, एचडीएफसी, डीओपी, टाटा इंडिकॅश , बँक ऑफ इंडिया या बँकांचे कंत्राट आहे. औरंगाबाद जिल्ह्यामधील एटीएमसाठी मनेज सर्व्हिस प्रोव्हायडर (एमएसपी) यांच्याकडून त्यांना बँकेमार्फत रोख मिळते व ती एटीएम सेंटरमध्ये टाकण्याची जबाबदारी कंपन्यांकडे असते. याचा लेखाजोखा लोकेशन इन्चार्ज यांच्याकडे जमा असतो.

एटीएमचे त्रैमासिक लेखा परीक्षण केले जाते. शेवटच्या लेखापरीक्षणात मात्र एक कोटी १६ लाख ८० हजार रुपयांची अफरातफर आढळून आली. त्यात योगेश पुंजाराम काजळकर (रा. सरस्वती कॉलनी, भीमनगर), सचिन एकनाथ रंधे (रा.प्लाॅट नं. २२१ जटवाडा रोड, हर्सूल), अविनाश ज्ञानेश्वर पडूळ (रा. पडूळ गल्ली, लाडसावंगी ), सिद्धांत रमाकांत हिवराळे (भीमपुरा, उस्मानपुरा), अमित विश्वनाथ गंगावणे (रा. भीमनगर, भावसिंगपुरा), अनिल अशोक कांबळे (भावसिंगपुरा), बाबासाहेब श्यामराव अंभुरे (रा. एन-२, रामनगर), संजय भालचंद्र जाधव (रा. वाळूज) यांचा या घोटाळ्यात कंपनीच्या अहवालात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. उपशाखा अधिकारी रमेश रायभान साठे (३७) यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरीष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

कसा केला नेमका घोटाळा

कंपनीच्या मुख्य लेखापरीक्षकांकडून सोपवलेल्या मार्गांवरील प्रत्येक एटीएममध्ये जाऊन नोटा मोजण्याच्या मशीनने त्या एटीएममध्ये असणारी सर्व रोख मोजली जाते. त्यानंतर ती भरणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेतली जाते. कंपनीकडे औरंगाबाद शाखेच्या अखत्यारीत एकूण सात रुट आहेत. प्रत्येक रुटच्या व्यवस्थापनासाठी दोन कर्मचारी, एटीएम ऑफिसर, एक गनमॅन, एक चालक असतो.

मागील वर्षभरात आरोपींनी पैसे भरताना मात्र दिलेल्या रकमेतून हळूहळू रोख रक्कम कमी टाकण्यास सुरुवात केली. ऑडिटमध्ये ते समोर येऊ नये म्हणून ऑडिट दरम्यान जवळील एटीएमचे पैसे ऑडिट पुरते वळवायचे. सदर एटीएमचे ऑडिट होताच ते काढून तत्काळ पुढील ऑडिट होणाऱ्या एटीएममध्ये टाकायचे असे प्रकार केले. त्यामुळे स्थानिक ऑडिटमध्ये लवकर हा प्रकार समजून आला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या