कर्जासाठी औरंगाबाद महापालिका बँकेच्या दारात!

कार्बन झीरो बाँड वापरणार
कर्जासाठी औरंगाबाद महापालिका बँकेच्या दारात!

औरंगाबाद - aurangabad

महापालिकेचे (Municipal Corporation) प्रशासन कार्बन झीरो बाँडच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयांचा निधी कर्जाच्या माध्यमातून काढण्याचा विचार करीत आहे; त्याशिवाय एशियन डेव्हलपमेंट बँकेसह (Asian Development Bank) अन्य काही बँकांचा पर्याय देखील पालिका कर्जासाठी तपासत आहे.

महापालिकेने कर्ज काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'स्मार्ट सिटी योजने'तील महापालिकेला आपल्या हिश्शाचे २५० कोटी रुपये भरायचे आहेत. हा निधी दिल्याशिवाय स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेला शासनाकडून उर्वरित निधी मिळणार नाही.

पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे पालिका स्वबळावर एवढी रक्कम देऊ शकत नाही, त्यामुळे कर्ज काढून स्मार्ट सिटीसाठीचा निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५० कोटी रुपयांपैकी ६५ कोटींचा निधी पालिकेने ऑक्टोबर महिन्यात स्मार्ट सिटीसाठी दिला आहे. उर्वरित निधी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत दिला तरच स्मार्ट सिटी योजनेचा उर्वरित निधी मार्च अखेरपर्यंत पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.

या संदर्भात माहिती देताना (Administrator Astik Kumar Pandey) प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले, 'औरंगाबाद महापालिका राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत कर्जमुक्त महापालिका आहे. (lic) एलआयसीचे केवळ १७ लाख रुपयांचे कर्ज महापालिकेवर आहे. स्मार्ट सिटीचा निधी भरण्यासाठी व अन्य कामांसाठी तिनशे कोटींचे कर्ज काढण्याबद्दल विचार सुरु आहे. एकदम तिनशे कोटींचे कर्ज घेण्याऐवजी बाँड विक्रीतून काही निधी उभारावा व काही निधी कर्जाच्या माध्यमातून उभारावा अशी कल्पना पुढे आली आहे. त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचा महत्त्वाचा पर्याय आमच्या समोर आहे. कार्बन झिरो बाँडच्या रूपाने कर्जरोखे उभारण्याचा विचारदेखील केला जात आहे.

Related Stories

No stories found.