फेरीवाल्यांच्या खात्यावर सहाय्यता अनुदान जमा

प्रत्येकी 1500 रुपये मिळाले
फेरीवाल्यांच्या खात्यावर सहाय्यता अनुदान जमा

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन काळात फेरीवाले व पथविक्रेत्यांवरही निर्बंध लागू केले आहेत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रत्येकी 1500 रुपये सहाय्यता अनुदान देण्याचे जाहिर केले. त्यानुसार शहरातील 11 हजार 603 फेरीवाल्यांच्या बॅक खात्यावर 1500 रुपयाचे अनुदान जमा झाले आहे. यामुळे फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाला.

फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लाटेचा झपाटयाने प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तातडीने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे कडक निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हातावर पोट असणार्‍या आर्थिक दुर्बल घटकासाठी पॅकेज जाहिर करुन फेरीवाले व पथविक्रेते, रिक्षाचालक यांना मदत म्हणून प्रत्येकी 1500 रुपये देण्याची घोषणा केली.

या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने शासन निर्णय देखील काढला. फेरीवाले, पथविक्रेते, रिक्षाचालक यांना निर्बंधाच्या काळात उदरनिर्वाहासाठी सहाय्य व्हावे, म्हणून दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहिर करुन 1500 रुपये अनुदान थेट बॅक खात्यावर जमा करण्यासाठी अनुदान मंजूर केले. शहरात 14 हजार 103 फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 11 हजार 603 फेरीवाल्यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आत्मनिर्धार योजनेंतर्गत कर्जासाठी बॅकांत अर्ज दाखल केलेले आहेत. त्यानुसार 29 एप्रिल पासून थेट फेरीवाल्यांच्या बॅक खात्यावर 1500 रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com