सक्तीचा परिणाम ; पेट्रोल बंद करताच साडेसात लाख जणांनी घेतली लस

सक्तीचा परिणाम ; पेट्रोल बंद करताच साडेसात लाख जणांनी घेतली लस

औरंगाबाद - aurangabad

लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांना (जिल्हाधिकार्‍) जिल्हाधिकार्‍यांनी पेट्रोल-डिझेलसह गॅस (Gas with petrol-diesel) न देण्याचे फर्मान जारी केले होते. परिणामी या आदेशानंतर जिल्हा व शहरात मिळून साडेसात लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याचा लसीकरणाचा (Vaccination) शहराचा टक्का ६२.७२ वर पोहचला आहे.

औरंगाबाद शहरात ११ लाख २५ हजार ६५२ पैकी ७ लाख ५ हजार ९८१ जणांनी दुसरा डोस घेतला असला तरी अद्यापही ४ लाख १९ हजार ६७१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासाला पुन्हा एकदा कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ग्रामीण भागातील चित्र यापेक्षाही वेगळे आहे. २3 लाख १२ हजार ८४८ जण दुसऱ्या डोससाठी पात्र असताना आतापर्यंत १४ लाख ९ हजार ९९ जणांनीच हा दुसरा डोस घेतला आहे. अद्याप ९ लाख २ हजार ९४८ जणांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

कोरोनाची (corona) तिसरी लाट आली आणि काही दिवसातच गेली देखील. त्यामुळे कोरोनाचे भय संपल्याने जिल्ह्यातील निर्बंध उठविले असले तरी दोन महिन्यापुर्वी सरकारने लसीकरणाच्या टक्केवारीवर जिल्हानिहाय कोरोनाचे निर्बंध उठविले होते. त्यावेळी लसीकरणाचा टक्का कमी असल्याने औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे पुन्हा ऑक्शन मोडवर आले होते. जिल्ह्यात दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या एकूण ११ लाख २५ हजार ६५२ नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दुसरा डोस नसलेल्यांना पेट्रोल-डिझेल, गॅस न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची कठोरपणे अंमलबजावणीही करण्यात आली. काही पेट्रोल पंपांवर लसीकरणासाठी पथकेही तैनात केली होती. परिणामी, सुमारे साडेसात लाखापेक्षा जास्त जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

अलर्ट गरजेचा

सध्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाने दुसरा अवतार घेत धुमाकुळ घातला आहे. चीनमधील काही भागात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागु करण्यात आला आहे. हाकोरोनाचा नवीन अवतार भारतात आल्यास पुन्हा कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचे १०० टक्के लसीकरण होणे गरचेचे झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com