Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedश्री संत गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी शेगाव नगरी सज्ज

श्री संत गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी शेगाव नगरी सज्ज

दिपक सुरोसे

शेगाव – Shegaon

- Advertisement -

श्री संत गजानन महाराजांची (Shri Sant Gajanan Maharaj) पालखी दि.३ ऑगस्ट रोजी शेगावला पोहचणार असून स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर (Pandharpur) पायी वारीकरिता भजनी दिंडी अश्वासह दि.६ जून रोजी ७०० च्यावर वारकऱ्यांसह मार्गस्थ झाली होती.

शहरातील पालखी मार्ग :- सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येते की, श्रींचे पालखीचे बुधवार दि.३ रोजी शेगाव नगरीमध्ये आगमन होत आहे. श्रींचे पालखीचा श्री ग.म.वाटीका येथे दुपारचा विसावा राहील. दुपारी २ वाजता श्रींचे पालखीचे वाटीका येथून जगदंबा चौक, एम.एस.ई.बी. चौक, रेल्वेस्टेशन, श्री अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री लहुजी वस्ताद चौकातून, श्री मंदिर परिसरात आगमन होईल.

Video पिंपळगाव हरेश्वर येथील ‘हरीहरेश्वर मंदिर’ एक प्राचीन तपोभुमी

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १३ जुलै रोजी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघाली. दि.३ ऑगस्ट रोजी संतनगरीत लाखो भाविकांसह दाखल होणार आहे. श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५३ वे वर्ष आहे.

दि.२ ऑगस्ट रोजी खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. दि.३ ऑगस्ट रोजी खामगाव येथून पहाटे ५ वाजता खामगाव शहरातून नगरपरिक्रमा करुन शेगाव संतनगरीकडे मार्गस्थ होणार आहे. खामगाव ते शेगाव या १६ की.मी. अंतरावर लाखो भक्तांच्या मानवी साखळी भक्तांच्या भक्तीसागर श्रींच्या पालखी समवेत हा पाहावयास मिळणार आहे.

वाटेत श्रींच्या भक्तांकडून चहापाण, फराळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. संतनगरीत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने वारकरी शिक्षण संस्था (श्री गजानन वाटीका) याठिकाणी श्रींच्या पालखीसमवेत येणाऱ्या भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शेगावात श्री गजानन महाराज पालखीची नगरपरिक्रमा सुरुवात होईल. याठिकाणी भक्तांच्या उपस्थिती वारकऱ्यांचा टाळ मृदंगाच्या तालावर श्रींचा नामघोष विठ्ठल नामाचा जयघोष हरिनामाचा नामघोष करीत पारंपारीक मार्गाने श्रींची पालखीचे स्वागत होवून सायंकाळी श्रींच्या मंदिरात पालखी सोहळा पोहचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या