जी-२० साठी परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू

विमानतळावर दिमाखदार स्वागत 
जी-२० साठी परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar

शहरात प्रथमच होत असलेल्या जी-२० परिषदेतंर्गत महिला-२० परिषदेसाठी विदेशी पाहुण्यांचे आगमन होत आहे. महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा संध्या पुरेचा, पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार डॉ. शमिका रवि यांच्यासह युरोपीयन संघ, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, तुर्की, देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाल्या. यामध्ये चेरील मिलर, अमेरिकेच्या केल्सी हॅरिस यांच्यासह नार्मिया बोहलेर, सिबुलेले पोस्वायो, सेव्हिम काया, सारे ओत्झुर्क, फातिमा उर्झिक, पल्लवी पटनाईक आणि एमलॉन तिर्की या महिला प्रतिनिधींचा समावेश आहे.

जी-२० साठी परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू
याठिकाणी ड्रोन उडवल्यास जेलची हवा!

विमानतळावर उतरताच त्यांचे औक्षण करून पुष्पहार घालून जोगदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलींच्या लेझीम पथकाच्या कवायती पाहून महिला प्रतिनिधी आनंदीत झाल्या. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महिला प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हिंदुस्थानला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्या दृष्टीने देशातील विविध शहरांत जी-२० परिषद घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला हा बहुमान मिळाला असून जी-२० परिषदेंतर्गत दोनदिवसीय महिला-२० परिषद भरविली जात आहे. या परिषदेसाठी विविध देशांतून महिला प्रतिनिधी आज शहरात दाखल होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com