महिलांचा गाऊन घालून चोऱ्या करणारा जेरबंद 

महिलांचा गाऊन घालून चोऱ्या करणारा जेरबंद 

औरंगाबाद- Aurangabad

नागरिकांची बंद घरे फोडण्यासाठी अट्टल घरफोड्याने नामी शक्कल लढविल्याचे त्याच्या मुसक्या आवळल्यावर समोर आले. घरफोड्या करण्यासाठी तो चक्क महिलांचे गाऊन आणि स्वेटर परिधान करायचा. त्यानंतर घर बंद दिसताच ते भरदिवसा फोडून दागिने आणि रोकड लंपास करायचा. या घरफोड्याला दोन बायका आणि सात मुले आहेत. त्याच्यावर आतापर्यंत पाच पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. नईम उर्फ चुन्नू उस्मान शहा (37, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे या अट्टल घरफोड्याचे नाव आहे.

उच्चभ्रू वसाहतींमधील बंद घरे फोडण्याच्या सवयीचा चुन्नू हा दोन बायकांचा दादला आहे. त्याने पहिल्या पत्नीला काही वर्षांपूर्वी सोडून दिले. मग त्याने दुसरा विवाह केला. आता पहिल्या आणि दुसजया पत्नीची अशा सात मुलांचा घरफोड्या चुन्नू सांभाळ करतो. पूर्वी त्याच्याविरुध्द खून, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने घरफोड्यांना सुरुवात केली. एन-1, सिडको, मयूरपार्क, जटवाडा अशा उच्चभ्रू वसाहतींमध्ये त्याने महिलांचे गाऊन परिधान करुन घरफोड्या केल्या. रविंद्रकुमार रामसुंदर सेठी (54, रा. एन-1, सिडको) यांचे नऊ ते दहा महिन्यांपूर्वी त्याने घर फोडले. त्यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लांबवले. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी वकिल खलील अहमद गुलाम (55, रा. गरवारे स्टेडीयमजवळ, एन-1, सिडको) यांचे घर फोडून रोख, दागिने लांबवले होते.

या घटना ताज्या असताना पतीवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असल्यामुळे घराला कुलूप लावून गेलेल्या कडूबाई बालाजी चाथे (45, रा. म्हसोबानगर, हर्सुल) यांचे मध्यरात्री घर फोडून दागिने आणि रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबवला. या घटनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तांत्रिक पध्दतीने तपास सुरु केला. तेव्हा चुन्नूने घरफोड्या केल्याचे समोर आले.

Related Stories

No stories found.