'फाईव्ह स्टार' हॉटेल्सचे बिल न देता पळणारा जेरबंद 

परराज्यातही अनेक गुन्हे
'फाईव्ह स्टार' हॉटेल्सचे बिल न देता पळणारा जेरबंद 

औरंगाबाद - Aurangabad

शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलात कॉन्फरन्स असल्याची थाप मारून मुक्काम ठोकत महागडी सिगारेट, दारूसह पंचपक्वान्नचा मनसोक्त आस्वाद घेत बाहेरून येतो असे सांगून पसार होणार्‍या भामट्याला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भीमसेंट जॉन असे या भामट्याचे नाव असून त्याने हॉटेल रामा व अजंता अम्बॅसेडरला देखील चुना लावल्याचे तपासात समोर आले आहे.

भीमसेंट जॉन याने हॉटेल कीजमध्ये रूम केली. विश्वास बसावा म्हणून ऍग्रीकल्चर कॉन्फरन्स असल्याची थाप मारली. रूमसाठी अनामत रक्कम देखील भरली नाही. त्यानंतर त्याने रूममधे राहून महागडी 25 सिगारेट मागवल्या. मात्र, महागडी व्हिस्की मागवली असता हॉटेलच्या मॅनेजरला त्याच्यावर संशय आला. जॉनने अनामत रक्कम जमा केली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडे मॅनेजरने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकच संशय आल्याने त्याचे आधारकार्ड इंटरनेटवर तपासून ते बनावट असल्याचे समोर आले. तात्काळ याची माहिती वेदांतनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेतले. दरम्यान या टोळीकडून अजून काही हायप्रोफाईल गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली असून यांच्या गँगमध्ये अजून किती सदस्य आहेत याची पोलीस खातरजमा करत आहेत. या घटनेमुळे हायसोसायटी ग्राहक असलेल्या हॉटेल व्यवसायींकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जॉन याने औरंगाबाद, मुंबई, मनिपाल, धारवाड, गोवा अशा अनेक शहरात फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून मनसोक्त मौजमजा केली. त्यासाठी त्याने सहा ते सात बनावट नावे वापरली. शहरातील हॉटेल रामा, अजंता अम्बॅसेडरला देखील चुना लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com