Sunday, April 28, 2024
HomeUncategorized'नीट' परीक्षेत विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीशी खेळ होतोय का?

‘नीट’ परीक्षेत विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीशी खेळ होतोय का?

औरंगाबाद – aurangabad

देशभर निष्पाप विद्यार्थ्यांच्या अमूल्य शैक्षणिक कारकिर्दीशी खेळणारे नेमके कुठले रॅकेट सक्रिय आहे की काय? एजन्सीच्या संकेतस्थळाशी कुणी सायबर गुन्हेगार (Cyber ​​criminals) छेडछाड करीत आहेत काय? याबाबत संशयास जागा असल्याचे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने (Aurangabad High Court) या प्रकरणाचा नीट परीक्षा (Good exam) घेणार्‍या परीक्षा एजन्सीने अभ्यासपूर्वक आढावा घ्यावा आणि प्रकरणाच्या मूळाशी जाऊन गांभीर्याने कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत. 

- Advertisement -

Video तापी नदीत असा कोसळला ट्रक…

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा दिलेल्या भूमिजा नेमीचंद राठोड या विद्यार्थिनीने पहिल्यांदा निकालपत्र डाऊनलोड केले तेव्हा ७२० पैकी ६६१ गुण मिळाल्याचे दिसून आले तिने दुसर्‍यांदा गुणपत्रिका डाऊनलोड केली तर त्यात २१८ गुण असल्याचे आढळून आले. सातत्याने पाठपुरावा करुनही जेव्हा या मागचे गौडबंगाल समोर येईना तेव्हा तिने अँड्‌. चैतन्य धारूरकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिका फेटाळताना झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. 

खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, संकेतस्थळावर उपलब्ध होणाऱ्या भिन्न गुणतालिका आणि त्यामुळे “नीट’च्या परिक्षार्थीना होणारा मनस्ताप यांचे वाढते प्रकार बघता आघाडीच्या वर्तमानपत्रांमधून विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रगटन अथवा जाहिरात प्रकाशित करून तसेच आपल्या संकेतस्थळाद्वारे राष्टीय परीक्षा एजन्सीने व्यापक जनजागृती घडवावी व अशाप्रकारे फसवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तातडीने योग्य ती पाऊले उचलावीत. साधारण महिन्याभराच्या कालावधितच भिन्न आणि विसंगत निकालपत्रिकांच्या तीनहून अधिक केसेस आमच्या निदर्शनास आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमक्षही अशाच केस दाखल झाल्याचे आम्हाला समजले आहे.

या प्रकरणांची वाढती संख्या आणि व्याप्ती पाहता नीट परीक्षा राबवणार्‍या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने विद्यार्थ्यांचा हिताकरिता तातडीने आपल्या संकेतस्थळावर व मुद्रित माध्यमांद्वारे अशा प्रकारे फसवणूक अथवा दिशाभूल झालेल्या परीक्षार्थींनी आपल्या तक्रारींबाबत स्वत:हून पुढे येऊन आवाज उठवण्याचे आवाहन प्रकाशित करावे व प्राप्त तक्रारींबाबत सायबर गुन्हे शाखा अथवा सक्षम तपास यंत्रणांना अवगत करवून उचित तपास करण्याची विनंती करावी असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

औरंगाबाद येथील विद्यार्थीनी भूमिजा राठोड हिने वैद्यकीय शाखेसाठीची नीट प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबर २०२२ मध्ये जाहीर झाला. भुमिजा हिस निकालाच्या दिवशी डाऊनलोड केलेल्या निकालपत्रात ७२० पैकी ६६१ गुण प्राप्त झाल्याचे आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्यासंबंधी तिच्या आशा पल्लवित झाल्या. तथापि, तीन दिवसानंतर काही कारणांसाठी पुन्हा एजन्सीच्या संकेतस्थळावरून निकालपत्र डाऊनलोड केले असता त्यात तिला अवघे २१८ प्राप्त झाल्याचे दिसून आले. घडलेल्या प्रकारामुळे व्यथित होऊन भूमिजा हिने परीक्षा एजन्सीकडे ई-मेल पाठवून दाद मागितली. परंतु, त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तिने उच्च न्यायालयात दाद मागितली.

सुनावणी दरम्यान खंडपीठाने परीक्षा एजन्सीस नोटीस बजावली व याचिकाकर्तीच्या मूळ ओएमआर उत्तरपत्रिका सादर करण्यास एजन्सीच्या वकिलांना सूचित केले. मात्र, ओएमआर उत्तरपत्रिकांमधील उत्तरे ही अल्प गुण असलेल्या निकालपत्राशी मेळ खात असल्याने न्यायालयाने याचिका नामंजूर केली. दरम्यान, यामागे काहीतरी गडबड आहे, अशी शंका व्यक्त करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश पारीत केले आहेत. याप्रकरणी अँड्‌. धारुरकर यांना अँड्‌. मयुर सुभेदार यांनी सहाय्य केले. तर परीक्षा एजन्सीकडून आशिष जाधवर यांनी काम पाहिले. 

- Advertisment -

ताज्या बातम्या