म्युकरमायकोसिसने वाढवली चिंता

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता म्युकरमायकोसिकने शहराची चिंता वाढवली आहे. मागील काही दिवसांतच म्युकरमायकोसिसच्या मृतांची संख्या ही शंभरीपार गेली आहे. म्युकरमायकोसिस आजाराने रोज दोन ते तीन जणांचा मृत्यू होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद शहरात आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून, शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी शहरात रोज दाखल होत आहेत.

त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आजाराने मागील महिनाभरातच शंभर जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान मंगळवारी घाटी रुग्णालयात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच नवीन 15 रुग्णांची भर पडली आहे. आजवर दाखल झालेल्या 910 रुग्णांपैकी 510 जणांची रुग्णालयातून उपचारानंतर सुटी झाली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *