औरंगाबादच्या अनुपला 2500 डॉलरचे पारितोषिक

‘कोव्हर्ट’ चर्चासत्रात घेतला सहभाग  
औरंगाबादच्या अनुपला 2500 डॉलरचे पारितोषिक

औरंगाबाद - Aurangabad

सिंगापूर येथील झिलीका प्रा.लि. व बंगळुरू येथील ब्लॉक चेन इंडिया यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘100 डेज ऑफ कोव्हर्ट’ या राष्ट्रीय चर्चासत्रात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Devagiri Engineering College) संगणकशास्त्र विभागाचा विद्यार्थी अनुप भदे याने 2500 यूएस डॉलरचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांच्या हस्ते अनुपचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला.

लोणेरे (जि.रायगड) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्र विषयाच्या अंतिम वर्षात अनिवार्य विषयांबरोबच वैकल्पीक विषयांची सांगड घालून देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा वैकल्पीक विषय घेता येतो. अनुप भदे याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा विषय निवडला होता. त्यात विषयामध्ये आणखी रस निर्माण झाल्याने अनुप भदे याने ‘100 डेज ऑफ कोव्हर्ट’ या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेत त्याच्या संघाने 100 दिवसांच्या या चर्चा सत्रात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा प्राथमिक अभ्यास करत सिला प्रोग्रामिंग लँग्वेज, स्मार्ट कॉन्ट्रॅक्टस्‌ लिहीण्याचे ज्ञान घेतले आणि यातून एक सोशल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करून त्याचे प्रात्यक्षिक त्याठिकाणी सादर केले. त्याच्या या प्रात्यक्षिकाला हे 2500 यूएस डॉलरचे (भारतीय 1,86,400 रू.) तृतीय क्रमांकाचे पोरितोषिक मिळाले.

अनुपच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण यांनी अनुपचा सत्कार करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनुपचे वडील मिलिंद भदे, आई वृषाली भदे, प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर, प्रा.संजय कल्याणकर यांची देखील उपस्थिती होती. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात संगणकशास्त्र अंतिम वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयाबरोबर सर्वच वैकल्पीक विषय शिकवले जातात. यासाठी विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना विषय निवडीची संधी दिल्या जाते. वैकल्पीक विषयासाठी 50 विद्यार्थी असो अथवा एकच विद्यार्थी असला तरी त्याला आम्ही तो विषय शिकवतो. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत आले आहेत असे देखील डॉ.उल्हास शिऊरकर यांनी सांगितले. या चर्चासत्रासाठी अनुप भदेला विभागप्रमुख प्रा.संजय कल्याणकर, प्रा.पंकज दुरोळे यांचे मार्गदर्शन मिळाले. अनुपच्या या यशाबद्दल मशिप्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष शेख सलीम, कार्यकारिणी सदस्य विवेक भोसले, डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा.प्रकाश तौर, डॉ.राजेश औटी, डॉ.गजेंद्र गंधे, डॉ.सुनील शिंदे, प्रा.रूपेश रेब्बा, प्रा.अच्युत भोसले, प्रा.अमर माळी आदींनी अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com