
औरंगाबाद- Aurangabad
अंगणवाडीत (Anganwadi) दाखल होणाऱया प्रत्येक मुलांना सकस व गरम आहार देण्यासोबतच अंगणवाड्याही सक्षम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून लवकरच अंगणवाड्यांमध्ये वाय-फाय (Wi-Fi), एलईडी स्क्रीन (LED screen) लागल्याचे पाहायला मिळणार आहे.
सक्षम अंगणवाड्यामध्ये फ्री वाय-फाय ((Wi-Fi)) इंटरनेट कनेक्शन (Internet), ऑडिओ व्हिडिओ (Audio-video system) सुविधेसाठी एलईडी स्क्रीन (LED screen) आणि परसबाग विकसित केली जाणार आहे. यासाठी राज्य शासन प्रती अंगणवाडी ४० हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. जि.प. महिला व बालकल्याण विभाग आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्यावतीने अंगणवाड्या चालविण्यात येतात.
अंगणवाड्यांत दाखल होणाऱ्या बालकांना शासनाकडून सकस असा गरम, ताजा आहार खाऊ घातला जातो. अंगणवाडीत बाळ जास्त वेळ रमले तर त्याला तेथे बिनधास्तपणे बागडता यावे, यासाठी दरवर्षी देशातील २ लाख अंगणवाड्या सक्षम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्याला राज्य शासनाच्या वतीने साद देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सक्षम अंगणवाड्यांना उत्तम सेवासुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यात अंगणवाड्यांमध्ये इंटरनेट (Internet), वाय-फाय कनेक्टिव्हिटी ((Wi-Fi)), वायफाय पेन ड्राईव्ह, एलईडी स्क्रीन (LED screen), जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, ऑडिओ-व्हिडिओ सिस्टीम बसविणे (Audio-video system), अंगणवाडीच्या आवारात परसबाग तयार करून बालकांसाठी प्रसन्न वातावरण तयार करणे आणि अंगणवाड्यांचे रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करणे, आदींचा समावेश असल्याची माहिती विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.