औरंगाबादेत कोरोना रुग्णांना आमरसाची मेजवानी!

प्रशासनाच्या अनोख्या बेताचे तोंडभरून कौतुक
औरंगाबादेत कोरोना रुग्णांना आमरसाची मेजवानी!

औरंगाबाद - Aurangabad

महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्समधील कोरोना रुग्ण व त्यांना उपचाराची सेवा देणार्या कोरोना योद्धांना अक्षय तृतीया व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी आमरसाची मेजवानी दिली. आमरसासोबत मुगवडा भाजी, चकली, शेवयांची मेजवानी पाहून घरच्यांपासून दूर असलेल्या कोरोना रुग्णांनी प्रशासनाच्या या अनोख्या बेताचे तोंडभरून कौतूक केले.

महापालिका प्रशासनाने अक्षय तृतीया व रमजान ईदच्या निमित्ताने हा आमरस मेजवानीचा उपक्रम राबवला. एमआयटी व सिपेट कोविड केअर सेंटर येथील रुग्ण डॉक्टर्स, सपोर्ट स्टाफ, पालिका वॉररूम, येथील देवकीनंदन शुधा सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक, शासकीय महाविद्यालय (घाटी) शासकीय कॅन्सर रुग्णालय येथील रुग्णांचे नातेवाईक, लसीकरण जागृती मोहिमेतील मेडिकल विद्यार्थी, मेघालय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थीनी, एन-4 येथील कामगार नाक्यावरील कामगार आणि इतर ठिकाणचे कोविड रुग्ण तथा त्यांचे नातेवाईक असे मिळून 1700 जणांना या मेजवानीचा लाभ मिळाला.

आमरस बनविण्याच्या प्रक्रियेत अन्नामृत फाउंडेशनच्या पूर्णवेळ टीमसोबत 30 स्वयंसेवक, तसेच विशेष सहभाग आमदार अंबादास दानवे, अतुल सावे, पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे, औरंगाबाद मैत्री ग्रुपच्या योगिता सातपुते, अर्चना अग्रवाल अर्चना कुलकर्णी, दीपा जव्हेरी, अंकिता फडके, गौरी कुलकर्णी, ज्योती यादव, मीनाक्षी बत्तासे, आशा पाटील, दीपक आठले, पुराणिक यांनी सहकार्य केले. तर वितरण सेवेमध्ये डॉ. संदीप शिसोदे, सणद जैन, अरविंद पात्रीकर, राजेश भारूका, डॉ. रमेश लड्डा, विनोद बगडिया यांनी परिश्रम घेतले. सुजित उपळकर यांनी व श्री रामनिवास गटांनी विशेष योगदान व सहकार्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com