औरंगाबादवरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द !

ट्रॅकवर पाणी साचल्याचा परिणाम 
औरंगाबादवरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द !

औरंगाबाद- Aurangabad

मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे या भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने औरंगाबाद मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी काही दिवस या रेल्वे रद्द राहणार असल्याची शक्यता रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत शनिवारी रात्री पावसाने रौद्ररुप धारण केले. त्याशिवाय, ठाणे, मुरबाड, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण या भागातही चांगलाच पाऊस झालेला आहे. यामुळे शनिवारी रात्री मुंबईहून निघणाऱ्या अनेक रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली. तसेच, प्रवासात असलेल्या रेल्वे सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत.

या पावसामुळे मुंबई रेल्वेमार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहेत. या मार्गावरील सर्व रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनशताब्दी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. जालना-औरंगाबाद ते दादर ही जनशताब्दी रेल्वे रद्द करण्यात आली आहे.

नांदेड ते सीएसटीएम जाणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी आणि नंदीग्राम याही रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर तपोवन एक्सप्रेसचाही वेळापत्रक बदलण्यात आला आहे. मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com