Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedहॉटेल्स, मॉल, विवाह, थिएटरसह सर्वच निर्बंध हटणार

हॉटेल्स, मॉल, विवाह, थिएटरसह सर्वच निर्बंध हटणार

औरंगाबाद (Aurangabad)

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्याने यापूर्वीच अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी लाेकांच्या उपस्थितीबाबत अजूनही मर्यादा घालण्यात आलेली आहे. पण आता हॉटेल (Hotels), मॉल (malls), चित्रपटगृहे (cinemas) तसेच लग्नसोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येवरील सर्व निर्बंध हटवावेत, असा अहवाल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Collector Sunil Chavan) यांनी शासनाला पाठवला आहे. जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीसाठी आलेल्या अर्जाला परवानगी देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनाची (corona) तिसरी लाट आता ओसरत आहे. मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हळूहळू निर्बंध कमी केले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे शहर, ग्रामीण भागातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाळूज, जरंडी येथील कोविड केअर सेंटरही (Covid Care Center) लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

७० वार्डात होणार लसीकरण

जिल्ह्यात ८ लाख लोकांचा दुसरा डोस शिल्लक आहे. त्यामुळे लसीकरण (Vaccination) गतीने करण्यासाठी शहरात ७० खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून ७० वार्डात लसीकरणाची (Vaccination) मोहीम सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वार्डात एक खासगी डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून या वार्डातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) केले जाईल. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या