अरेरे... सासऱ्याच्या घरासमोर ट्रकच्या धडकेत जावयाचा मृत्यू

फुलंब्री तालुक्यातील घटना
अरेरे... सासऱ्याच्या घरासमोर ट्रकच्या धडकेत जावयाचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

सासऱ्याच्या घरासमोरच एका ट्रकने जावयाला चिरडल्याची घटना शनिवारी फुलंब्री तालुक्यातील जातेगाव भागात घडली. आजीनाथ जगन्नाथ राऊत (वय ३०, रा. आडगाव खुर्द, ता. फुलंब्री) असे मृताचे नाव आहे.

राऊत हे फुलंब्री-राजूर रस्त्यावरून जातेगाव परिसरातील सासरवाडीत गेले होते. ते शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास दुचाकीवर गावाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा सासऱ्याच्या घरासमोरच राजूरकडून-फुलंब्रीकडे जाणाऱ्या ट्रकने (एम. एच. २१ बी. एच.१११५) चिरडले. राऊत यांची दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकात अडकल्याने ते फरफटत गेले. त्यांच्या पायाला आणि हृदयाला जोराचा मार लागला. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेने जात असलेल्या एका बैलालाही धडक दिली. यात बैलाचाही मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com