Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद आणि इंगोलस्टॅट शहरामध्ये करार

औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट शहरामध्ये करार

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद शहर आणि (Germany) जर्मनीमधील इंगोलस्टॅट (Ingolstadt) शहरामध्ये ट्वीन सिटी अग्रीमेंट करण्यात आले आहे. आज या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. औरंगाबादकडून मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Smart City CEO Astik Kumar Pandey) आणि इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. खिस्तियन श्राफ (Mayor Dr. Christian Shroff) यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

- Advertisement -

मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्यातर्फ गेल्या वर्षभरापासून जर्मनी मधील इंगोलस्टॅट शहरसोबत टूवीन सिटी अग्रनीमेंट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी द्वारे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मोठ्या प्रयत्नानंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ, उपमहापौर डॉ. दोरोथे डेनेके, इंगोलस्टॅटचे शिक्षण आणि सांस्कृतिक विभागप्रमुख गॅब्रीएल एंजर्ट, सांस्कृतिक विभागाच्या क्रिस्टिना दिएडरीच, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या विभागप्रमुख ब्रिगीट स्टॉकल, मेलानी कुनेल, म्युनिक जर्मनीसाठी भारताचे कौन्सिल कौन्सिलेट जर्नल डॉ.सुयश चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, ऑरीकचे व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक उपस्थित होते.

या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटचे संबंध वृध्दिंगत होतील. भारत आणि जर्मनी, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्या संबंधांवर देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटमध्ये शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील. शहरांमध्ये स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल. जोपर्यंत दोन्ही शहरांचा प्रतिसाद मिळत राहील, तोपर्यंत हा करार अबाधित असेल. या कराराला कुठलीही कालमर्यादा नाही, असे पाण्डेय म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या