Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसाथरोग नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

साथरोग नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

औरंगाबाद – aurangabad

पावसाळयामध्ये (Rainy season) उद्भणाऱ्या संभाव्य जलजन्य व किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी म्हणून औरंगाबादच्या आरोग्य विभागाने (Department of Health) पूर्ण केली आहे. तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके (District Health Officer Dr. Sudhakar Shelke) यांनी सांगितले.

- Advertisement -

पुरामुळे जखमी, सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांवर तातडीने औषधोपचार करणे, या सर्व रुग्णांचा औषधोपचारानंतर ते पूर्ण बरे होईपर्यंत पाठपुरावा करणे, मदत पुनर्वसन विभागाशी समन्वय ठेवणे, पुरामुळे विस्थापित झालेल्यासांठी उघडण्यात आलेल्या शिबिरांमधील कुटुंबियांची काळजी घेतांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता आदी कार्यवाही करण्यात येणार आहे. विष्ठेची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्यदायी शौचालय उपलब्ध करुन देणे. (आवश्यकता भासल्यास जास्तीचे, तात्पुरते खड्डे खणून शौचालय उपलब्ध करुन देणे). अन्न पदार्थांमध्ये फक्त ताजे अन्नच वाटप होईल, अन्नाची कुणीही साठवणुक करणार नाही, याची दक्षता घेणे. अतिजोखमीच्या व्यक्तीची (5 वर्षाखालील बालके, गरोदर, स्तनदा माता व वयोवृद्ध, नियमित तपासणी करुन विशेष काळजी घेणे. लसीकरण न झालेल्या, अंशत : संरक्षित बालकांना लसीकरण करणे (गोवर, पोलिओ). किरकोळ आजार व सर्वसामान्यपपणे आढळणाऱ्या त्वचारोग व श्वसन रोगांवर उपचार करुन त्यांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

पूर ओसरल्यावर प्रामुख्याने संसर्गजन्य आजार त्यांचे उद्रेक उद्भव होऊ शकतो, यामध्ये जलजन्य आजारामध्ये अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, काविळ व लेप्टोस्पायरोसीस, किटकजन्य आजार (हिवताप, डेंगी, मेंदुज्वर), लस प्रतिबंधित आजार (गोवर, पोलिओ) यांचा समावेश आहे.

जलजन्य व इतर आजारांचा उद्भव, उद्रेक होऊ नये म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सार्वजनिक स्तरावर सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांचे गुणात्मक विरंजक चूर्ण वापरुन शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करणे. पाणी शुद्धीकरणाचे व विरंजक चुर्णाचे गुणवत्ता नियमितपणे पडताळणे. टँकरने पाणी पुरवठा करताना शक्यतो ज्या स्त्रोतातून पाणी टँकरमध्ये भरले जाते, त्या स्त्रोतांचे गुणवर्धक विरंजक चूर्ण वापरुन शुद्धीकरण करावे. पाण्याचे मूळ स्त्रोत (तलाव, पाणवडे किंवा कुपनलिका) शुद्ध करणे शक्य नसल्यास टँकरच्या वाहन चालकास मेडिक्लोर क्लोरीन गोळ्यांचा पुरेसा साठा देऊन पाणी शुद्धीकरणाचे तंत्र शिकवून टँकरमधील पाण्याचे शुद्धीकरण करावे. तर घरगुती स्तरावर ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठा उपलब्ध नाही. त्याठिकाणी पाणी उकळून पिणे. घरोघरी मेडिक्लोर, मदर सोल्यूशनचे वाटप किवा क्लोरीन टॅबलेटचा वापर करावे. शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे.

अन्नपदार्थांसोबत काळजी घेताना रोजच्या रोज तयार केलेल्या ताजे अन्न पदार्थांचे सेवन करावे. शिळे व साठवलेले अन्नाचे सेवन करु नये. उघड्यावर बनवलेले, साठवेलेले व विकले जाणारे अन्न पदार्थ खाऊ नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या