
औरंगाबाद - aurangabad
अजिंठा व्ह्यू पॉईंट, अजिंठा पर्यटक केंद्र (Ajanta Tourist Center) आणि (Ajanta Caves) अजिंठा लेण्यांची प्रत्यक्ष पाहणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांनी आज केली. अजिंठा लेणी परिसराची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून त्यांनी या ठिकाणी मोबाईलने छायाचित्रेही त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली. त्याचबरोबर लेणीतील बारकावे, इतिहास समजून घेतला.
त्यांच्यासमवेत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पुरातत्व विभागाचे अधीक्षक मिलन कुमार चावले, पर्यटन संचालनालयाचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, विजय जाधव आदींची उपस्थिती होती.
मंत्री ठाकरे यांनी लेणी क्रमांक 1, 2, 4, 9, 10, 19 आणि 26 यांची प्रत्यक्ष पाहणी करून या लेणी वैभवाची महती प्रत्यक्ष जाणून घेतली. त्यांना श्री.चावले यांनी सविस्तर माहिती दिली. जयस्वाल यांनी व्ह्यू पॉईंट येथे लेणीच्या निसर्ग संपन्नता आणि व्ह्यू पॉइंटची माहिती दिली. लेणी परिसरातून वाहणाऱ्या वाघूर नदीचे खाम नदीच्या धर्तीवरच पुनर्जीवन व्हावे, वृक्ष लागवडीसाठी इको बटालियनची मदत घेऊन वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपन व्हावे, अशी अपेक्षा राज्यमंत्री सत्तार यांनी पर्यटन मंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.