Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedखबरदार... गव्हाचा साठा करून ठेवाल तर!

खबरदार… गव्हाचा साठा करून ठेवाल तर!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

केंद्र शासनाच्या (Central Govt) अधिसूचनेनुसार घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिटेल्स व प्रोसेसर्सकरिता गव्हाच्या साठ्यावर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्बंध लागू केलेले आहेत. जे गव्हाचा अतिरिक्‍त साठा करतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी दिले आहेत.

- Advertisement -

केंद्राच्या अधिसूचनेनुसार घाऊक व्यापारी ३ हजार टन, किरकोळ व्यापारी प्रत्येक आऊटलेटसाठी १० टन, बिग चेन रिटेलर्स प्रत्येक आऊटलेटसाठी १० टन व डेपोसाठी ३ हजार टन व प्रोसेसर्स वार्षिक स्थापित क्षमतेच्या ७५ टक्के किंवा मासिक स्थापित क्षमता गुणिले सन २०२३-२४ चे उर्वरित महिने यापैकी जे कमी असेल, असा साठा करू शकतात. व्यापाऱ्यांकडे असणारा गव्हाचा साठा १२ जून २०२३ च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास, तसेच http://evegoils.nic.in/wsp.log.in या संकेतस्थळावर या अधिसूचनेच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील.

केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितप्रमाणे प्रकट करण्याबाबत शासनाने आदेशित, निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्स यांनी संकेतस्थळावर विहित मुदतीत प्रकट करण्यात यावा. त्यानंतर संकेत स्थळावर दर शुक्रवारी साठ्याबाबतची माहिती नोंद करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधापेक्षा गव्हाचा साठा जास्त आढळून आल्यास व साठेबाजी करणाऱ्या संबंधित आस्थापना व्यापाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या