Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये 'एनडीपीएस'ची दमदार कारवाई

औरंगाबादमध्ये ‘एनडीपीएस’ची दमदार कारवाई

औरंगाबाद – aurangabad

शहरात अवैधरीत्या नशेच्या गोळ्या विक्री करणाऱया दोघांना वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ६०० रुपयांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई (Police) पोलीस आयुक्तालयाच्या (ndps) ‘एनडीपीएस’च्या पथकाने केली.

- Advertisement -

शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेंतर्गत असलेल्या अंमली पदार्थविरोधी कृती पथकाने (एनडीपीएस) ही कारवाई केली. या कारवाईबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएसच्या पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन यांना शहानूरमियाँ दर्गा चौकाच्या परिसरात नशेच्या औषधी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन यांच्यासह सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, धर्मराज गायकवाड, महिला पोलीस अंमलदार प्राजक्ता वाघमारे, चालक शंकर सुंदरडे व औषधी निरीक्षक जे. डी. जाधव यांच्या पथकाने शहानूरमियाँ चौकात अवैधरीत्या नशेच्या गोळ्या (बटन) विक्री करणाऱया राम धोंडू काळे (४५) याला एनडीपीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ नायट्रोसनच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने दिलेल्या माहितीवरून एपीआय कॉर्नरजवळील ठाकरेनगर येथील दिनेश साहेबराब हाबळे (५८) यालाही एनडीपीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पथकाला ४५ नायट्रोसनच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.

एनडीपीएसच्या पथकाने दीपक साहेबराव हावळे याच्या घरावर छापा मारला. त्याच्या ताब्यातून ५५५ नग नायट्रोसन १० च्या गोळ्या व ४८० रुपये रोख रकमेसह एक चाकूसारखे धारदार हत्यार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दीपक हावळे हा चारचाकी वाहनातून (एमएच २० एफयू ८०८६) नशेच्या औषधांचा व्यापार करीत होता. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुरुगोविंदसिंहपुरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी नशेच्या औषधी विक्री करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या