लसीकरण कमी झालेल्या गावातील सरपंचांवर कारवाई

जनजागृती करण्याच्या सूचना
लसीकरण कमी झालेल्या गावातील सरपंचांवर कारवाई

औरंगाबाद - aurangabad

जिल्ह्यात सर्वतोपरी प्रयत्न करून देखील (Zilla Parishad Health Department) जिल्हा परिषद आरोग्य विभागाला (corona) कोरोना प्रतिबंधक (Vaccination) लसीकरणाचा अपेक्षित टप्पा पार करता आलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदतर्फे आता कमी लसीकरण असलेल्या गावाच्या (Sarpanch) सरपंचावर थेट पद रद्दचीच कारवाई करण्याचे ठरले आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील कमी लसीकरण असलेल्या गावातील ४९ सरपंच (Gramsevak) ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ नीलेश गटणे (Zilla Parishad CEO Nilesh Gatne) यांनी दिली.

जिल्हा परिषदेतर्फे वारंवार सूचना देऊनही जिल्हातील लसीकरण वाढायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. आता आरोग्य विभागानेही हात टेकल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागांत मागील महिनाभरापासून दररोज दीड ते दोन हजार नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा देखील पार होणे अवघड झाले आहे. अनेक गावातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्या गावातील सरपंचांना वारंवार सूचना देऊन देखील लसीकरण वाढीसाठी त्यांच्याकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाही.

राज्यातील काही जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झालेले असताना औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस ८२ टक्क्यावर तर दुसरा डोस अवघ्या ६२ टक्क्यांवर अडकला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे यांनी जिल्हा परिषद अधिनियम १५९६१ च्या कलम ३९ नुसार सर्वात कमी लसीकरण असलेल्या गावातील सरपंचावर थेट पद रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी लसीकरण असलेल्या चार तालुक्‍यातील ४९ सरपंच ग्रामसेवकांना याबाबत नोटीस देखील देण्यात आली आहे.

येत्या काळात कमी लसीकरण झालेल्या गावांत सुधारणा दिसून आली नाही, तर सरपंच यांचे पद रद्द होणार आहे. तसेच ग्रामसेवकावर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात सरपंचांना आपल्या गावातील १०० टक्के लसीकरण करणे बंधनकारक होणार आहे. लसीकरणामध्ये जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड सर्वात मागे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com