60 लाखांची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद 

जवाहर नगर पोलीसात गुन्हा दाखल
60 लाखांची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद 

औरंगाबाद - Aurangabad

तुमच्या विरोधात आयकर विभागाकडे तक्रार आल्याचं सांगत एका व्यावसायिकाला 60 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरून जवाहर नगर पोलीस (Jawahar Nagar Police) ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले.

शहरात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करणाऱ्या सुशांत दत्तायत्र गिरी (35, रा. शिवशंकर कॉलनी) याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ओळखीच्या संजय पारख या व्यक्तीचा त्यांना फोन आला. त्यांनी तुमची तक्रार आयकर विभागाच्या कार्यालयात आली आहे, अशी खोटी माहिती गिरी यांना दिली. तसेच आयकर विभागाचे अधिकारी अरविंद जवळगेकर ओळखीचे आहेत, तुमची स्टेलमेंट करून देतील असेही या संजय पारखने सांगितले. या प्रकरणात रात्री 10 वाजताच्या सुमारास बीड बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये सुशांत गिरी, संजय पारख, त्यांच्यासोबत अरविंद जवळगेकर आणि महेश चौधरी यांची भेट झाली. संजय पारख याने अरविंद जवळगेकर यांची ओळख आयकर विभागातील अधिकारी अशी करून दिली, तर महेश चौधरी यांची ओळख त्यांचे स्वीय सहाय्यक अशी करून देण्यात आली.

या बैठकीत सुशांत गिरी यांना तुमच्यावर दीड ते दोन कोटी रुपयांचा आयकर बुडवल्याचा आरोप असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून सुशांत गिरी अवाक् झाले. हे प्रकरण बाहेर मिटवण्यासाठी 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे दिले नाही तर तुम्हाला डी. के. पाटील आत्महत्या प्रकरणात अडकवू, तुम्हाला त्रास देऊ अशीही धमकी दोघांनी दिली. त्यांना 60 लाख रुपये देऊ शकत नसल्याचे सुशांत गिरी यांनी स्पष्ट सांगितले. यामुळे चाळीस लाख रुपये देण्याचे ठरलं. हा प्रकार खंडणी उकळण्याचा असल्याची शंका आल्याने सुशांत गिरी यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून अरविंद जवळगेकर, महेश चौधरी व संजय पारख या तिघांच्या विरोधात खंडणी, फसवणूक करणे या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणात महेश चौधरी याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अन्य दोन आरोपींपैकी संजय पारख हा सुशांत गिरी यांच्या ओळखीचा असून तो जमीन विक्रीचा व्यवसाय करतो, तर अरविंद जवळगेकर हा इन्शुरन्सचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com