बनावट ऊंट बिडी प्रकरणातील आरोपीला मिळाली तीन दिवसांची पोलीस कोठडी

jalgaon-digital
1 Min Read

मलकापुर – Malkapur

प्रचलित ऊंट बीडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्याला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्री केल्या जात असुन या मुळे शासनाला टॅक्स भरून हा व्यवसाय करणाऱ्या बिडी कंपनीला आर्थीक नुकसान होत असल्याने या बाबतची शाहनिशा केल्या नंतर ऊंट बिडीचे सर्वेअर अमोल कुलकर्णी यांनी याची तक्रार मलकापुर शहर पोलिसात दिल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दिलदार तडवी, शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्या पथकाने शुक्रवारी 12 मार्च रोजी मलकापुर शहरातील बुलढाणा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील रामचंद्र ट्रेडर्सवर धाड टाकली असता दुकानातून ऊंट बिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला होता यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याचे विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 102 , 103,104 तसेच कॉपीराईट एक्ट 1957 चे कलम 63 आणि भादवीच्या कलम 420 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती.

आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पो. उप. नि.म्हसाळ करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *