स्मार्ट सिटी' प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचालींना वेग

आयसीसीसीसाठी लवकरच निविदा
स्मार्ट सिटी' प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचालींना वेग

औरंगाबाद - Aurangabad

केंद्र सरकारच्या (Central Government) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक (Smart City) स्मार्ट सिटी योजना औरंगाबादमध्ये राबवली जात असून आता ही योजना गुंडाळण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. शहर विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटी अभियानासंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली.

या बैठकीत स्मार्ट (Smart City) सिटीच्या प्रकल्पांना गती देऊन ते तातडीने पूर्ण करावेत. तसेच एकात्मिक कमांड अँण्ड कंट्रोल सेंटर अ‍ॅप्लिकेशनसह एमएसआय प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित करावेत, असे निर्देश केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्र (Durga Shankar Mishra) यांनी दिले आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आणि एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय व एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत भाग घेतला. स्मार्ट सिटी प्रकल्पात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शहरी स्थानिक संस्थेंचे अनुक्रमे 50 टक्के, 25 टक्के आणि 25 टक्के असे निधीचे योगदान आहे. औरंगाबाद पालिकेला स्मार्टसिटी प्रकल्पात आजवर केंद्र व राज्य सरकारने दिलेल्य निधीनुसार 147 कोटी रूपये जमा करावे लागणार आहेत. पालिकेच्या या योगदानाशिवाय केंद्र व राज्याचा उर्वरित निधी मिळणार नाही. केंद्र सरकारने पालिकेला हा निधी लवकरात लवकर स्मार्ट सिटीत टाकण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पालिकेचा हिस्सा काही दिवसातच स्मार्ट सिटीला देण्यात येईल, असे प्रशासक पांडेय यांनी स्पष्ट केले.

आयसीसीसीच्या अ‍ॅप्लिकेशन शिवाय मास्टर सिस्टम इंटिग्रेटर प्रकल्प कार्यान्वित करता येणार नाही. त्यामुळे शहरांनी आयसीसीसी प्रकल्प लवकरात लवकर राबवायला हवा, असे देखील बैठकीत सूचित केले. आयसीसीसी अ‍ॅप्लिकेशनद्वारे सीसीटिव्ही कॅमेरा फीड, पर्यावरण सेन्सर आणि वाहन ट्रॅकिंग सिस्टम यासारख्या एमएसआय प्रकल्पांचे विविध घटक एकत्रित एका डॅशबोर्ड वर आणण्यास मदत होईल. त्यानुसार आयसीसीसीसाठी निविदा तयार तयार केली असून लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com