Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग

औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग

औरंगाबाद – Aurangabad

आगामी काळात शहराचा विकासाचा वेग लक्षात घेता औद्योगिक विकासाला साह्यभूत ठरणार्‍या औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे प्रस्तावित असल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेल्या चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी याठिकाणी मोजणी झालेल्या जागांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.

- Advertisement -

यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जी.साळवे, सहायक महाप्रबंधक सुधीर जगदाळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, नगर भूमापन अधिकारी जी. आर. सोनार, विमानतळ प्राधिकरणाचे कनिष्ठ तांत्रिक अभियंता अमित सिंग, रितेश रमन तसेच मोजणीदार संतोष मस्के व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विमानतळ विस्तारीकरणात आवश्यक असलेल्या व मोजणी झालेल्या जमिनीवर योग्य ते मार्किंग करुन खांब अथवा खूणा दिसतील अशा रंगात आणि ती जमिन विमानतळ प्राधिकरणाची आहे. अशा संदेशाचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना त्यांनी सूचना दिल्या. या भेटीदरम्यान विमानतळ प्राधिकरणाचे साळवे यांनी शहरातील विमानतळ तयार झाल्यापासून यामध्ये झालेले बदल व पार्श्‍वभूमी याविषयी माहिती दिली. तांत्रिक पथकाने विमानतळाच्या नकाशाप्रमाणे कोणकोणत्या बाबी प्रस्तावित आहे याबाबत माहिती दिली.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 182 हेक्टर जमिन प्रस्तावित असून याच्या भूसंपादनाची प्रक्रियेसाठी मोजणी व सर्वेक्षण सुरू आहे. भारतीय विमान प्राधिकरणाच्या औरंगाबाद कार्यकक्षेतील जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला. गावठाण व शहर हद्दीत असलेल्या जमिनीच्या संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी तसेच सिटी सर्वेच्या अधिकार्‍यांना यावेळी त्यांनी आवश्यक सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या