Monday, April 29, 2024
HomeUncategorizedस्वतःच्या मुलीवर अत्याचार; नराधमाला तिहेरी जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर अत्याचार; नराधमाला तिहेरी जन्मठेप

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar

पोटच्या मुलीवर (own daughter) अत्याचार (torture) करून तिला गर्भवती केल्यानंतर तिच्यावर दबाब टाकून खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणात डीएनए चाचणी आधारे न्यायालयाने (Court) नराधम पित्याला (father) विविध कलमांखाली तिहेरी जन्मठेप (Triple life imprisonment) आणि १ लाख ९५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच गुन्हा लपविणाऱ्या पीडितेच्या मातेलाही (victim’s mother) सहा महिन्यांची सक्तमजुरी (forced labor )आणि एक हजार रुपये दंडाची (Punishment of fine) शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली.

- Advertisement -

चौदा वर्षीय पीडितेच्या नराधम पित्यानेच आधी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्याच्या दीड महिन्यापूर्वी पीडितेची मासिक पाळी न आल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. नराधम पित्याच्या खोट्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडितेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी नराधमाने पीडितेला माझे नाव सांगू नको, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात नराधमाचे नाव घेतले नाही. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीडितेचा आणि अर्भकाचा डीएनए घेण्यात आला. त्यावेळी नराधम पित्याला आपण फसणार असल्याची कुणकुण लागली. तेव्हा त्याने व पीडितेच्या आईने पीडितेला घेऊन रुग्णालयातून पळ काढला होता. नंतर ते रेल्वेने दोन दिवस पसार झाले.

तिसऱ्या दिवशी त्यांनी पीडितेला रेल्वेस्थानकावर आणून सोडले व ते दोघे पुन्हा पसार झाले. गुन्हा दाखल करण्याच्या दीड महिन्यापूर्वी पीडिता रात्री घरातील बाजेवर झोपलेली असताना नराधम पित्याने मध्यरात्रीनंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने विरोध केला असता त्याने तिला मारण्याची धमकी दिली. दुसर्‍या दिवशी सकाळी पीडितेने पोट दुखत असल्याची बाब आईला सांगितली. त्यांनतर पीडितेला दोन-तीनवेळा रुग्णालयात दाखवले, मात्र तिला फरक पडला नाही. त्यामुळे नराधमाने पीडिता गर्भवती आहे का? हे तपासण्यास सांगितले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र, नराधमाने पत्नीला ही बाब न सांगता पीडितेच्या पोटात गोळा असल्याचे सांगितले. 

घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना पीडितेने घडलेली घटना आईला सांगितली. मात्र, आईने ही बाब पोलिसांपासून लपून ठेवली. या प्रकरणात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजश्री आडे आणि उपनिरीक्षक आरिफ शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. विशेष म्हणजे पीडिता ही फितूर झाली. तर घाटीतील चार डॉक्टर, डीएनए अधिकारी आणि वयाच्या पुराव्यासाठी मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविकेचा जबाब महत्त्वाचा ठरला.

सुनावणीअंती न्यायालयाने खोटी तक्रार दिल्यासंदर्भात भादंवि कलम २०३ अन्वये दोन वर्षे आणि १० हजार रुपये दंड, १८२ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, भादंवि कलम ३७६ अन्वये जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड, पोक्‍्सोच्या कलम ४ अन्वये जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड, कलम ६ अन्वये जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड, आणि बालसंरक्षण कायद्याच्या कलम ७५ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा नराधम पित्याला ठोठावली.

तर पोक्सोच्या कलम २१ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा पीडितेच्या आईला ठोठावली. या प्रकरणात अँड. शिरसाट यांना अँड. नितीन मोने यांनी साह्य केले. पैरवी म्हणून रज्जाक शेख यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या