Monday, April 29, 2024
HomeUncategorizedअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 'पोक्सो'

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ‘पोक्सो’

औरंगाबाद – aurangabad

एका विवाहित तरुणाने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

- Advertisement -

एका कुटुंबाकडे असलेली रिक्षा चालविण्यासाठी आरोपी राहुल गायकवाड याला दिलेली होती. त्यामुळे आरोपी राहुल हा त्या कुटुंबाच्या घरीच अनेकवेळा राहत होता. या संबंधाचा गैरफायदा घेत कुटुंबातील अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवूत १३ नोव्हेंबर रोजी घरातून पळवून अहमदनगरातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केले. त्यापूर्वीही पीडितेच्या घरी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पीडितेच्या पुरवणी जबाबानुसार पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या