Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअभाविपचे ढोल बजाव आंदोलन

अभाविपचे ढोल बजाव आंदोलन

पुणे |प्रतिनिधी|Pune

अभाविपच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय येथे महाराष्ट्रातील

- Advertisement -

एमबीए, अभियांत्रिकी, बीएड-एमएड व विविध अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी ‘ढोल बाजाव’ आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे आंदोलन करेल” असा ईशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील व्यवस्थापन शास्त्र (MBA) च्या प्रवेश परीक्षा होऊन २३६ दिवस होऊन गेलेत, निकाल लागून १६६ दिवस झालेत तरी देखील कोणत्याच प्रकारची प्रवेश प्रक्रिया शासनाने चालू केलेली नाही. आयआयएम तसेच खाजगी महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया संपवून वर्ग देखील ऑनलाईन पद्धतीने चालू केले आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी अंतिम वर्षाचे निकाल लागण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया चालू होत असते तरी देखील आजपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली नाही. तसेच अभियांत्रिकी, विधी, संगणक शास्त्र, वास्तूकला शास्त्र, बी.एड – एम.एड व ईतर अभ्यासक्रमात शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संबंधित प्रवेश परीक्षा (MAH-CET) बरेच महिने होऊन सुद्धा अजूनही प्रशासनाने निकाल जाहीर केले नाहीत.

कोणत्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया (CAP Rounds) चालू न झाल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच ह्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. कारण महाराष्ट्र वगळता ईतर राज्यांमध्ये महाविद्यालय चालू देखील झालेले आहे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी व्यस्थापन शास्त्र, (MBA) १,२००००, बीएड ,१,२०,००० विधी अभ्यासक्रमासाठी ४४,००० अभियांत्रिकी ४,३५,६५३ इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अर्ज भरला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी आज संभ्रमात आहे. प्रवेश प्रक्रिया कधी चालू करणार याची वाट विद्यार्थी पाहत आहे, महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी हिताचा तात्काळ निर्णय करावा सर्व निकाल त्वरित जाहीर करून प्रवेश प्रक्रिया चालू करावी म्हणून अभाविप पुणे महानगराच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले, तरी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया त्वरित चालू करण्यासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनाला विद्यार्थी उपस्थित होते.

“महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे आंदोलन करेल” असा ईशारा या वेळी महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला. या वेळी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री श्री. नागसेन पुंडगे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या