बलात्कार करून महिलेचा दगडाने ठेचून खून

छत्रपती संभाजीनगरात खळबळ
बलात्कार करून महिलेचा दगडाने ठेचून खून

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar

चर्चमधून घरी परतणाऱ्या महिलेचा (woman's) रस्त्यात अडवून तिच्यावर नराधमांनी सामूहिक अत्याचार (Mass atrocities by murderers) केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिची दगडाने ठेचून हत्या (Stoned to death) केली. ही क्रूर घटना चिकलठाणा परिसरातील मोतीवाला कॉलनी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी तीन जणांना घटनेच्या काही तासांतच अटक केली आहे. राहुल संजय जाधव, प्रितम महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड (तिघेही रा. बकाल वस्ती, चिकलठाणा) असे या आरोपींची नावे आहेत.

पूजा (नाव बदलले आहे) या कुटुंबासह याच परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचे पती हे मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी पूजा आपल्या तीन मुलांना घेऊन शेजारच्या महिलेसोबत परिसरात नव्याने उभारलेल्या चर्चमध्ये गेल्या.

साधारणत: तीन वाजेपर्यंत चर्चमध्ये प्रार्थना असल्यामुळे सकाळी १० च्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास पूजा यांचे पोट दुखत असल्याने चर्चमधून त्या घरी निघाल्या. ऊन जास्त असल्यामुळे त्यांनी मुलांना शेजारच्या महिलेसोबत येण्यास सांगितले. त्यानंतर घरी परतताना बाटेत आरोपी प्रितम, राहुल व रवी यांनी तिला अडवले. त्यानंतर तिघांनी तिचे हात झाडाला बांधून विवस्त्र करत अत्याचार केला.

जुन्या बायपास परिसरात निर्मनुष्य भाग असल्याने तिघांनी महिलेची दगडाने ठेचून हत्या केली. शेजारील महिला व पूजाची मुले प्रार्थना संपवून घरी येत असताना त्यांना पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात झुडपांमध्ये पडलेल्या अवस्थेत दिसली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिक व पूजाच्या पतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी पूजाला मयत घोषित केले. याप्रकरणी तीन आरोपीविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे हे घटनास्थळी पोहोचले. घटनचे गांभीर्य लक्षात घेता उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ तसेच गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक घड्याळ व हातातील कडे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी या भागातील रेकॉडवरील गुन्हेगारांची तपासणी केली. त्यात संबंधित तिघांवर संशय बळावला. पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिघांनी उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com